सोलापूर : दोन कारची समोरासमोर धडक होऊन डॉक्टर दांपत्यासह सहा जण ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजता मोहोळ तालुक्यातील पेनूरजवळ घडली. डॉ. अफरीन खान (आतार, 30), त्यांचे पती मुजाहीद इमाम आतार (35) अराफत मुजाहिद आत्तार, इरफान नूरखान खान, बेनजीर इरफान खान, ईनया इरफान खान अशी मृतांची नावे असून अन्य चौघे
गंभीर जखमी असाहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसर्या गाडीतील अनिल हुंडेकरी (35 ), मनीषा मोहोन हुंडेकरी (30) हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले आहे.