कुर्‍हा गावातील तरुणाची विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या

कुर्‍हाकाकोडा : कुर्‍हा गावातील सोपान अशोक तायडे (28) या तरुणाने सोमवारी सकाळी 8.30 वाजेच्या काहीतरी विषारी द्रव प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. मयत तरुणाच्या पश्‍चात आई, वडील पत्नी, मूल, भाऊ असा मोठा परीवार आहे. याबाबत रवींद्र तायडे यांच्या खबरीवरून मुक्ताईनगर पोलिीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.