चाळीसगावात पकडला तब्बल 94 लाखांचा गुटखा : कंटेनर चालकासह दोघे जाळ्यात
चाळीसगाव शहर पोलिसांची दमदार कामगिरी : गुटखा तस्करांचे कारवाईने दणाणले धाबे
चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर तब्बल 93 लाख 97 हजार 200 रुपये किंमती गुटखा कंटेनरमधून जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. चाळीसगावसह परीसरातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असल्याचे आधीदेखील कारवाईतून स्पष्ट झाले आहे तर रविवारी ओझर गावाजवळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत कोट्यवधींचा गुटखा जप्त करण्यात आल्याने तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. उमर मोहम्मद दिनू मोहम्मद (42, बिशमभरा, ता.छाता, जि.मथुरा, उत्तरप्रदेश) व ईम्रान कुशल (32, शाहजादपूर, ता.छाता, जि.मथुरा, उत्तप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आरोपींना सोमवारी चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मध्यप्रदेशातून येणार्या एका कंटेनरमध्ये गुटखा असल्याची गुप्त माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर ओझरजवळ पोलिस पथकाने सापळा लावला. यात या कंटेनरमध्ये पाईव्हएचके कंपनीचा 73 लाख 87 हजार रुपयांचा गुटखा आढळल्याने तो जप्त करण्यात आला तर सुमारे 20 लाखांच्या कंटेनरसह 93 लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कंटेनर चालकासह दोघांना पोलिसांनी अटक करीत त्यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला.
चाळीसगाव पोलिसांची सलग तिसरी मोठी कारवाई
यापूर्वी 4 फेब्रुवारीला चाळीसगाव-भडगाव रस्त्यावर वाघळी ते हिंगोणे दरम्यान पोलिसांनी चार लाख 26 हजार 800 रुपये किंमतीचा गुटखा व 5 लाख रूपयांचा आयशर ट्रक असा 9 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता तर 5 एप्रिल रोजी राजस्थान येथून चाळीसगावमार्गे मुंबईकडे जाणार्या गुटख्याचा कंटेनर जप्त करण्यात आला होता. या कंटेनरसह गुटखा मिळून एक कोटी 12 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता तर या दोन मोठ्या कारवायानतर आता पुन्हा सुमारे एक कोटींचा गुटखा जप्त झाल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहे.
राजस्थानातून मुंबईत गुटख्याची वाहतूक
गुटखा तस्करीचे आतापर्यंत राजस्थान कनेक्शन आढळले आहे. तस्कर राजस्थानातील गुटखा कंटेनरद्वारे मुंबईत पाठवतात व त्यासाठी दर 300 किलोमीटर अंतरावर कंटेनरचे चालकही बदलले जातात अर्थात चालकाकडून पोलिसांना गुटख्याची टीप मिळू नये हा तस्करांचा प्रयत्न असतो. कंटेनरमध्ये नेमका काय माल आहे हे कंटेनर चालकालादेखील ठावूक नसते त्यामुळे चेकपोस्ट येण्यापूर्वीच चालकाला संबंधित जागेवर कंटेनर सोडण्याची सूचना गुटखा तस्कर करतात व तेथून पुढे पुन्हा दुसरा चालक सुमारे 250 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंत कंटेनर नेतो. हे सर्व संभाषण केवळ मोबाईलवरच होते त्यामुळे गुटखा कुणाचा व कुठे त्याची वाहतूक होते या बाबी लवकर समोर येत नाही. राजस्थानात अवघ्या दिड ते दोन रुपयात मिळणार्या गुटख्याची पुडी मुंबईतील युपी व बिहारी बांधव आठ ते दहा रुपयात खरेदी करतात त्यामुळे या गुटख्याला मुंबईत मोठी मागणीही दिसून येते.
यांनी केली कारवाई
ही कारवाई चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस, सागर ढिकले, दीपक बिरारी, उपनिरीक्षक विष्णू आव्हाड, हवालदार राहुल सोनवणे, दीपक पाटील, भूषण पाटील, नीलेश पाटील, महेंद्र पाटील, अमोल पाटील, अमोल भोसले,