भालोदच्या बेपत्ता इसमाचा विहिरीत आढळला मृतदेह

यावल : तालुक्यातील भालोद येथील रहिवासी सतीष रामकृष्ण इंगळे (35) हे रविवारपासून बेपत्ता होते मात्र सोमवारी सकाळी अट्रावल रस्त्यावरील पी.टी.चोपडे यांच्या शेत विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेची माहिती कळताच फैजपूरचे सहा.पोलिस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हेमंत सांगळे, पोलिस नाईक महेश वंजारी, किरण चाटे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सिध्दार्थ भालेराव यांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह काढून यावल ग्रामीमण रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकिय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह नातेवाईकांना सोपवला. फैजपूर पोलिसात सुरज इंगळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक महेश वंजारी करीत आहे. मयताच्या पश्चात म्हतारी आई, पत्नी, मुलगा असा परीवार आहे.