भुसावळ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे मुंबई-रीवा आणि पुणे- जबलपूर दरम्यान उन्हाळी विशेष गाड्यांना रेल्वे प्रशासनाने मुदतवाढ दिल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या गाड्यांना मिळाली मुदतवाढ
02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रीवा विशेष गाडी दर शुक्रवारी धावणार असून या गाडीला आता 29 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर 02187 रीवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडीला 28 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. 02131 पुणे-जबलपूर अतिजलद विशेष गाडीला 15 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 02132 जबलपूर-पुणे अतिजलद विशेष गाडीला 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, या गाड्यांचे चालण्याचे दिवस, वेळ, संरचना आणि थांबे यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याने रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.