पारोळा : शिरपूर येथील सासर व पारोळा शहरातील लालबाग भागातील सासर असलेल्या 27 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार, 23 रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही. सुनीता जितेंद्र पाटील (27) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
पारोळा शहरातील लालबाग परीसरात जितेंद्र हिंमत पाटील हे आपली पत्नी सुनीता व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. सोमवार, 23 मे रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास विवाहिता सुनीता जितेंद्र पाटील (27) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केर्ल्याीरीक्ष पती जितेंद्र पाटील यांनी विवाहितेच्या आतेभाऊ तसेच विवाहितेचे आई-वडील यांना फोन करून सांगितले. नातेवाईकांच्या उपस्थितीत कुटीर रुग्णालयात विवाहितेला नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलीस स्थानकात आनंदा दत्तात्रय पाटील (शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत विवाहितेच्या पश्चात पती, दोन लहान मुले असा परीवार आहे. विवाहितेने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत पाटील तपास करीत आहेत.