जळगावातून पुन्हा चोरट्यांनी दुचाकी लांबवली

जळगाव : एमआयडीसीतील रेमंड कंपनीसमोरून पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरीचे सत्र कायम
सुनील पंडीत ठाकूर (38, रथचौक, कोळीपेठ, जळगाव) हा तरूण एमआयडीसीतील रेमंड कंपनीत नोकरीस असून बुधवार, 18 मे रोजी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता कंपनीत दुचाकी (एम.एच.19 सी.डी. 0073) ने कामाला आल्यानंतर दुचाकी कंपनीच्या समोर असलेल्या मोकळ्या ठिकाणी पार्कींग केली. दुपारी तीन वाजता कामावरून सुटी झाल्याने तो घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आला असता दुचाकी चोरी गेल्याचे लक्षात आले. सोमवार, 23 मे रोजी दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक विकास सातदिवे करीत आहे.