जळगाव : अयोध्यानगर भागातून वाळूची चोरटी वाहतूक करणार्या डंपरवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करीत वाहन जप्त केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
जळगाव शहरातील अयोध्या नगर भागातून डंपर (एम.एच. 19 झेड. 5248) मधून वाळूची चोरटी वाहतूक होत असताना सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, दीपक चौधरी, सचिन मुंढे यांच्या पथकाने सोमवारी डंपर ताब्यात घेतला. डंपर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने वाहनासह डंपरवरील चालक पवन शिवलाल सोनवणे (21, रा.बांभोरी, ता.धरणगाव) यास ताब्यात घेण्यात आले. जप्त डंपर मुकेश उत्तम साळुंखे (रा. बांभोरी प्र.चा., ता.धरणगाव) यांच्या मालकीचे असल्याची कबूली चालकाने दिली आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.