जळगाव : तालुक्यातील कानळदा गावातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एकाविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयीताविरोधात गुन्हा
जळगाव तालुक्यातील कानळदा येथे 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलीचे वडील शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. अल्पवयीन मुलगी रविवार, 22 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता घरी असतांना ती अचानक बेपत्ता झाली. गावातील भावेश बळीराम बोरसे यानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून सोमवार, 24 मे रोजी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिसात भावेश बळीराम बोरसे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.