चाळीसगावच्या बांधकाम व्यावसायीकाला 21 लाखांचा गंडा
पुण्याच्या व्यवस्थापकीय संचालकांसह एजंटाविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव : गोवा शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकामाचे सब कंत्राट देण्याच्या नावाखाली चाळीसगावातील बांधकाम व्यावसायीक प्रवीणसिंग ठोके यांना 21 लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात पुण्याच्या टेराफर्मा सुपरस्ट्रस्ट्रक्ट प्रा. लि. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह एजंटाविरुद्ध मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा
चाळीसगावातील बांधकाम व्यावसायीक प्रवीणसिंग जयसिंग ठोके यांची रमा इन्फ्रास्ट्रक्चर या नावाने कंपनी असून ते प्रथितयश बांधकाम व्यावसायीक आहेत शिवाय जळगावचे नितीन भगीरथ काबरे हे त्यांचे भागीदार आहेत. एजंट दीपकुमार मंडल याने काबरे यांची जळगावात भेट घेत पुण्यातील टेराफर्मा सुपरस्ट्रस्ट्रक्ट प्रा. लि. या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक प्रतित शहा यांच्याशी संपर्क साधून दिला व गावा येथे ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकामाचे कन्ट्रॅक्ट मेगावाईड कंपनीकडून पुणे येथील प्रतित शहा यांच्या कंपनीने 350 कोटींचे कंत्राट घेतल्याची बतावणी केली व त्यांना सब कंत्राटदाराची आवश्यकता असून तुम्हाला मी काम मिळवून देतो. म्हणत प्रतित शहा यांचे पुणे येथील कार्यालय व गोवा येथील बांधकामांची साईड दाखविली. त्यानंतर शहा यांनी 35 कोटी 78 लाख 23 हजार 376 रुपयांची वर्क ऑर्डर मेलवर पाठविली. त्यापोटी ठरल्यानुसार 8 मार्च 2022 रोजी 15 लाख व 11 मार्च 2022 रोजी 5 लाख असे एकूण 20 लाख रुपये शहा यांच्या कंपनीस पाठविले व एजंट दीपककुमार मंडल यांना एक लाख रुपये कमिशन दिले. यानंतर 17 मार्च रोजी गोव्यात सदर बांधकामाच्या साईडवर काम करण्यासाठी गेलो असता मेगावाईड कंपनीने प्रवेश दिला नाही. या कंपनीकडे चौकशी केली असता प्रतित शहा यांच्या कंपनीस केवळ दीड कोटींचे काम मिळाल्याचे स्पष्ट झाले व अनेकवेळा दिलेले पैसे मागवून ही शहा यांनी देण्यास टाळाटाळ केल्याने प्रवीणसिंग ठोके यांच्या फिर्यादी वरून
टेराफर्मा सुपरस्ट्रक्ट प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक प्रतित शहा (रा.308, मिलीनियम स्टार ढोले पाटील रोड, पुणे) व एजंट दिपककुमार मंडल ( रा.चौरीचौरा,दक्षिण परगना पश्चिम बंगाल) यांचे विरुद्ध भादंवि कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.