चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या संशयीत एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : शहरातील मासुमवाडी परीसरात चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या सराईत चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीव ग्यानप्रसाद सागर (33, रा.महालक्ष्मी दालमिल, एमआयडीसी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गस्तीवर असताना संशयीत जाळ्यात
शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या कंवरनगर पोलिस चौकीच्या हद्दीत पोलिस कर्मचारी हवालदार अतुल वंजारी, योगेश सपकाळे, सुनील सोनार, किरण पाटील, सचिन पाटील, राजश्री बाविस्कर हे सोमवार, 23 मे रोजी रात्रीच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन राबवत असताना आठवडे बाजारात संजीव सागर हा आपली ओळख लपवून फिरत असताना पोलिसांना पाहताच संशयीत पळू लागताच त्यास पकडण्यात आले. संशयीत रेकॉर्डवरील सराईत चोरटा असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.