छतावरील पत्रे काढताना वाद विकोपाला : मारहाण प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

भुसावळ : तालुक्यातील भानखेडा येथे बुधवारी किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. या प्रकरणी दोन जणांविरूध्द गुरूवारी रात्री तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पत्रे काढण्यावरून वाद
भुसावळ तालुक्यातील भानखेडा येथे तुकाराम बुधो सपकाळे (रा.भानखेडा) हे त्यांच्या भिल्ल वस्तीतील जुन्या घराचे पत्रे काढण्यास गेले असता त्याचा राग मधुकर सुकदेव सपकाळे व त्यांचा मुलगा महेद्र सपकाळे यांना आला. घर व घरावरील पत्रे आमचे आहे, तु घेण्यासाठी का आलास असे बोलून संशयीतांनी शिविगाळ केली व ारहाण केली. अंगणातील लाकडी काठी हातात घेत तुकाराम सपकाळे यांच्या छातीवर, हातावर, पायावर मारहाण करण्यात आली व ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तुकाराम सपकाळे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय भोई पुढील तपास करीत आहे.