जाखनी नगरात गावठी दारुची विक्री : महिलेविरोधात गुन्हा

जळगाव : शहरातील जाखनी नगरात अशाच पद्धतीने गावठी दारूची विक्री करणार्‍या महिलेवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून 600 रुपये किंमतीची 10 लिटर हातभट्टी दारू हस्तगत केली. शहरातील सिंधी कॉलनी परीसरात असलेल्या जाखनी नगरात बेकायदेशीर गावठी दारूची विक्री करणार्‍या महिलेवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारू हस्तगत केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैधरीत्या दारू विक्री करणार्‍यांमध्ये खळबळ
शहरातील सिंधी कॉलनी रोडवर असलेल्या जाखणी नगरात लक्ष्मी संजय अभंगे ही महिला बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी मिळाली. त्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील, योगेश सपकाळे, सुनील सोनार, छगन तायडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सपना येरगुंटला आणि किरण पाटील यांनी रविवार, 29 मे रोजी कारवाई करत बेकायदेशीर दारूची विक्री करत असलेल्या महिला लक्ष्मी अभंगेकडून 600 रुपये किंमतीची दारू जप्त केली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.