सावद्यात सामूहिक सोहळ्यात आठ जोडप्यांचे शुभमंगल
आसेमचा उपक्रम : आदिवासी तडवी समाजास प्रवाहात आणणे गरजेचे ; आमदार शिरीष चौधरी
सावदा : शहरातील नगरपालिकेच्या प्रभाकर बुला महाजन सभागृहात आदिवासी सेवा मंडळ अर्थात आसेम या सेवाभावी संस्थेतर्फे आदिवासी तडवी समाज बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा नुकताच झाला. या मेळाव्यात आठ जोडपी विवाह बंधनात अडकली. संस्थेचे हे सामूहिक विवाह सोहळ्याचे 25 वे रौप्य महोत्सवी वर्ष होते.
समाजाच्या मदतीसाठी सदैव तयार : आमदार चौधरी
अध्यक्षस्थानी रावेरचे आमदार शिरीष चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगरचे आचंद्रकांत पाटील तसेच समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थनावरून बोलतांना आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, आदिवासी तडवी समाज खूप मागासलेला समाज असून त्यास मुख्यप्रवाहात आणणे आवश्यक आहे. हे काम समाजातील शिक्षित व उच्च पदावर असलेल्या आपल्याच समाजबांधवांना करावे लागणार आहे. या समाज बांधवांनी आपल्या इतर समाज बांधवांना शिक्षित करून पुढे नेण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे त्यासाठी आमची मदत लागल्यास सदैव आपण तत्पर आहोत. आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील समाजाचे उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आपण केव्हाही आवाज द्या आपण हजर असल्याचे सांगितले. अश्या समाजोपयोगी कार्यक्रमाची नितांत आवश्यकता असल्याचे देखील सांगितले. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे म्हणाले की, प्रत्येक वेळी समाजाने जेव्हा आवाज दिला तेव्हा आपण साथ दिली असून यापुढेदेखील समाजासाठी प्रत्येक कार्यात समाजासोबत उभे राहू, असे सांगितले. आसेमचे अध्यक्ष राजू तडवी यांनी समजासाठी केलेले हे कार्य खरोखर उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
यांची मेळाव्यास उपस्थिती
मेळाव्याला मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजमा तडवी, यावलच्या माजी नगराध्यक्षा नौशाद तडवी, आसेम राज्याध्यक्ष नजमा तडवी, आसेम जिल्हाध्यक्ष अलिशान तडवी, सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे, माजी नगरसेवक फिरोज पठाण, राष्ट्रवादीचे रावेर तालुका कार्याध्यक्ष विलास ताठे, शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी, पत्रकार दीपक श्रावगे, आदिवासी प्रकल्प सेवा समिती सदस्य मासूम रेहमान तडवी, सेल्स टॅक्स विभागाचे माजी उपायुक्त नासीर तडवी,
कामील शेठ, गनी तडवी, संजय जमादार, दिलरुबाब तडवी, लियाकत जमादार व अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू तडवी यांनी केले. यावेळी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लागलेल्या प्रत्येक जोडप्यास संसारोपयोगी साहित्याचे वाटप देखील मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.