धुळ्यात तलवारीच्या धाकावर दहशत : आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

धुळे : शहरातील बापू भंडारी गल्ली क्रमांक सात भागात तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या भावेश पांडुरंग हळदे (21, बापू भंडारी गल्ली क्रमांक सात, देवपूर, धुळे) यास धुळे गुन्हे शाखेने अटक केली. संशयीत तलवार बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीच्या घरातून दोन हजार रुपये किंमतीची धारदार तलवार जप्त करण्यात आली. आरोपीविरोधात देवपूर पोलिस ठाण्यात राहुल रवींद्र गिरी यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, संजय पाटील, संदीप सरग, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी आदींनी पथकाने केली.