23 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बजरंग, विनोदला मिळाले रौप्यपदक!

0

नवी दिल्ली । पोलंडमध्ये सुरु असलेल्या 23 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या आशियाई विजेता बजरंग पुनिया आणि विनोदकुमारला अंतिम फेरीत पराभूत झाल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सुवर्णपदकासाठी झालेल्या एकतर्फी झालेल्या 65 किलो गटाच्या लढतीत रशियाच्या नचिन सर्गेइच कुलारने बजरंगला 17-6 असे हरवले. उपांत्य फेरीत बजरंगने इराणच्या योनेस अली अकबरला 9-4 असे हरवत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. अंतिम लढतीत बजरंगच्या तुलनेत कुलारचा तंत्रशुद्ध खेळ त्याला सुवर्णपदक देऊन गेला. विनाोदकुमारला अमेरिकेच्या रिचर्ड अँथनी लुईसकडून हार पत्करावी लागली.

या लढतीत विनोदने सुरुवातीला 1-0 अशी आघाडी मिळवली होती. पण या आघाडीनंतर विनोद लेगअ‍ॅटकचा बळी ठरल्याने त्याला 1-3 अशी हार स्वीकारावी लागली. उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या लढतीत विनोदने जपानच्या नोबुओशी तकोजीमाला हरवले होते.