रावेर : तालुक्यातील भोकरी फाट्याजवळ एका 23 वर्षीय तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी रावेर पोलिसात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील भोकरी येथील 23 वर्षीय तरूणी 14 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता शेतात शौचालयाला जात असतांना संशयीत आरोपी सुनील मिठाराम रायमळे (रा.तामसवाडी) याने तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे तर आरोपी इम्रान खान इद्रीस खान (रा.फतेशाहापुरा, रावेर) यानेदेखील लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याने दोघंविरुद्ध पीडीतेच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र जैन करीत आहेत.