चोपडा। स सन 2017-18 वर्षाच्या 23व्या गळीत हंगामासाठी चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मशनरी विभागात रोलर पूजन करण्यात आले.विधिवत पूजा करुन भाजप नेते घनश्याम अग्रवाल, अॅड.आर.आर. पाटील यांच्याहस्ते रोलर पूजन झाले. तसेच घनश्याम अग्रवाल, माजी आमदार कैलास पाटील यांनी इलेक्ट्रिक कळ (बटन) धाबुन रोलर वरती उचलण्यात आले. रोलर पूजन प्रसंगी चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, व्हाईस चेअरमन यांनी सांगितले कि, कारखाना मशिनरीचे कामे वेगात सुरू असून सर्व संचालक कारखान्याच्या हितासाठी काम करत कर्मचारी देखील मोठ्या उत्साहात काम करत असून शेतकर्यांनी देखील जास्तीत जास्त ऊस चोसाका ला देण्याचे काम करावे असे सांगितले.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
रोलर पूजनानंतर भाजप नेते घनःश्याम अग्रवाल यांनी सांगितले की, कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने कामगारांनी जास्तीत जास्त वेळ कारखाना सुरू करण्यासाठी ध्यावा तसेच येत्या हंगामात तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांनी जास्तीत जास्त ऊस आपल्याच कारखान्याला द्यावा, असे आवाहन केले आहे. सर्व संचालक एकदिलाने काम करत आहेत. याचा आनंद असून सातत्याने दोन-तीन वर्षे शेतकरी प्रकल्पाच्या पाठीशी उभा राहिला तर चोसाका चांगल्या स्थितीत उभा राहिलेला दिसून येईल.
यांची होती उपस्थिती
चेअरमन अतुल ठाकरे, व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे, आनंदराव रायसिंग, आत्मराम म्हाळके, प्रवीण गुजराथी, कांतीलाल पाटील, सुनील महाजन, नीलेश पाटील, भरत पाटील, भरत जाधव, सुरेश पाटील, संभाजी पाटील, एस.बी.पाटील, शसिकांत पाटील, मिलिंद पाटील, सागर पठार, भाऊसाहेब पाटील, मनोज सनेर आदी.