गुवाहाटी- २३ वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले गेगांग अपांग यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपा आता फक्त सत्ता मिळवण्यासाठीचा मंच बनल्याचे त्यांनी पक्ष सोडताना म्हटले आहे. त्यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष तपीर गाओ यांना याप्रकरणी पत्र लिहिले आहे. सध्याची भाजपा दिवंगत अटलबिहारी वाजपेयींच्या सिद्धांताचे पालन करत नसल्याने मला खूप वाईट वाटत आहे. ज्या मुल्यांवर पक्षाची स्थापना झाली होती. त्या मुल्यांना आता पक्षात स्थान नाही, अशी खंत त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.
त्यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष तपीर गाओ यांना याप्रकरणी पत्र लिहिले आहे.
मी ७ वेळा आमदार राहिलो असून २३ वर्षे राज्याचा मुख्यमंत्री होतो. मी भारतीय राजकारणात इंदिरा गांधी, राजीव गांधी, व्ही पी सिंह, आय के गुजराल, एच डी देवेगौडा, चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग सरकारबरोबर काम केले आहे. देशात सर्वाधिक मुख्यमंत्रिपदी राहण्यारे गेगांग अपांग दुसरे राजकीय नेते आहेत.
अपांग हे ईशान्य भारतातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री होते. यावेळी त्यांनी अमित शाह आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. अपांग हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत.