खिरोदा-पाल रस्त्यावर भरधाव अ‍ॅपे रीक्षा नाल्यात उलटल्याने एक ठार

सावदा : शहरापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या खिरोदा-पाल रस्त्यावर पालकडून खिरोदा मार्गे फैजपूर येथे जाणारी अ‍ॅपे रीक्षा (एम.एच.19 सीडब्ल्यू 0980) खिरोदा घाटाच्या आधीच्या भिलट बाबा मंदिरापुढे नाल्यात उलटल्याने झालेल्या अपघात एक जण ठार तर दुसरा जखमी झाला. हा अपघात मंगळवारी घडला. सावदा पोलिसांनी जखमीला तातडीने भुसावळ येथे उपचारार्थ हलवले.

सावदा पोलिसांची अपघातस्थळी धाव
या अपघातात कपले नामक फैजपूर येथील व्यक्ती ठार झाल्याची माहिती असून मंडवाले हा इसम जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जेसीबीद्वारे अ‍ॅपे रीक्षा बाहेर काढण्यात आली. हवालदार जयराम खोडपे, हवालदार युसूफ तडवी, मेहरबान तडवी, संजय तडवी, देवा पाटील यांनी तातडीने मदत केली.