रीमोल्डींग कामासाठी पाचोर्‍यात रेल्वेचा ब्लॉक : चार रेल्वे गाड्या रद्द

पाचोर्‍यात रीमोल्डींग काम : अप-डाऊन मार्गावरील 12 गाड्या विलंबाने धावणार : प्रवाशांची मोठी गैरसोय होणार

Railway block at Pachora station: Four trains were canceled for two days भुसावळ : रीमोल्डींग कामासाठी मध्य रेल्वेने भुसावळ विभागातून मुंबई, पुण्याकडे जाणार्‍या चार रेल्वे गाड्या शनिवारी व रविवारी रद्द केल्याने ऐनवेळी प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. रद्द गाड्यांमध्ये ईगतपुरी मेमू, सेवाग्राम एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर पुणे त्रीसाप्तहिक गाड्यांचा समावेश आहे. या शिवाय अप मार्गावरील आठ व डाऊन मार्गावरील चार अश्या 12 गाड्या विलंबाने धावणार आहेत. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पाचोरा रेल्वे स्थानकावर रीमोल्डींग कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे.

या रेल्वे गाड्या रद्द
12112 अमरावती मुंबई एक्सप्रेस रविवार, 14 रोजी अमरावती स्थानकातून सुटणार नाही तसेच 12111 मुंबई-अमरावती एक्स्प्रेस सोमवार, 15 रोजी मुंबई येथून सुटणार नाही. 12136 नागपूर-पुणे त्रीसाप्ताहिक एक्सप्रेस ही शनिवार, 13 रोजी नागपूर येथून सुटणार नाही तर 12135 पुणे-नागपूर त्रीसाप्ताहिक एक्सप्रेस रविवार, 14 रोजी पुणे स्थानकावरून सुटणार नाही. 11120 भुसावळ- ईगतपुरी मेमू ही गाह1ी रविवार व सोमवारी (14 व 15 ऑगस्ट रोजी) या दिवशी भुसावळ येथून सुटणार नाही तसेच ईगतपुरी भुसावळ मेमू गाडी सोमवार व मंगळवार (15 व 16 ऑगस्ट) असे दोन दिवस सुटणार नाही. 12140 नागपूर मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस रविवार, 14 ऑगस्ट रोजी नागपूर येथून सुटणार नाही तर 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस सोमवार, 15 ऑगस्ट रोजी मुंबई येथून सुटणार नाही.

या गाड्या धावणार विलंबाने
रविवार आणि सोमवार असे दोन दिवस या अप-डाऊन मार्गावरील गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील. यात भुसावळकडे येणार्‍या गाड्यांमध्ये 12627 बेंगलुरु-नई दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस 1 तास 10 मिनिटे, 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर-गोदान एक्स्प्रेस एक तास 10 मिनिटे, 12715 नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस 20 मिनिटे, 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर पवन एक्सप्रेस 20 मिनिटे थांबविण्यात येणार आहे.

अप मार्गावरील या गाड्या विलंबाने धावणार
भुसावळहुन मनमाडकडे जाणार्‍या गाड्यांमध्ये 22456 कालका-साईनगर शिर्डी द्विसाप्ताहिक एक्सप्रेस दोन तास 15 मिनिटे, 22512 कामाख्या लोकमान्य टिळक टर्मिनस वातानुकूलित साप्ताहिक एक्सप्रेस, 121089 सीतापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 17324 बनारस-हुबळी साप्ताहिक एक्सप्रेस, 11072 बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्सप्रेस या सर्व गाड्या दोन तास 10 मिनिटे, 11058 अमृतसर-मुंबई एक्सप्रेस 50 मिनिटे, 22537 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 50 मिनिटे, 11062 जयनगर लोकमान्य टिळक टर्मिनस पवन एक्सप्रेस 25 मिनिटे विविध रेल्वे स्थानकांवर थांबविली जाणार आहे.