साईबाबा मंदिराजवळून लांबवली दुचाकी : चोरटे बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

Kini Two Wheeler Thieves Net In Police Net भुसावळ : जामनेर रोडवरील साई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकाची दुचाकी लांबवताना सतर्क नागरीकांनी तीन चोरट्यांना पकडले तर एक संशयीत मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विष्णू काशीनाथ कोळी (19), अतुल भास्कर कोळी (23), राहुल मगन कोळी (22, सर्व रा.किन्ही) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या अटकेतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

मास्टर चावीने उघडले लॉक
भुसावळातील शिवकुमार विनोद खराडे (पंढरीनाथ नगर) हे गुरुवारी रात्री 8.40 वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरात देवदर्शनासाठी आले असता दुचाकी (एम.एच.19 डी.एम.9677) ही मंदिराबाहेर त्यांनी पार्क केली मात्र काहीच वेळेत चोरट्यांनी संधी साधल्यानंतर खराडे यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात चोरटे गाडी लांबवताना दिसून आले तसेच खराडे हे पोलिस ठाण्यात येत असताना खान्देश हॉटेल समोरील गल्लीतून चोरटे त्यांच्याच गाडीवर दिसल्याने त्यांनी संबंधिताना हटकल्याने उलट चोरट्यांनी धक्काबुक्की केल्याने बाजारपेठ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर तिघा चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास निलेश चौधरी करीत आहेत.