जळगाव : आजारपणाला कंटाळून अमरेंद्रसिंग रामप्रसादसिंग भदोरीया (56, रा.मोतीमहल अपार्टमेंट, राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार, 1 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आजाराला कंटाळून उचलले पाऊल
शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालय परीसरातील मोतीमहल अपार्टमेंटमध्ये अमरेंद्रसिंग भदोरीया हे वास्तव्यास होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने या आजारपणाला कंटाळून त्यांनी शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. . ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांची तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सून असा परीवार आहे. भदोरीया मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. याप्रकरणी रविवारी दुपारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहेत.