अमळनेर। गांधलीपुरा भागातील कृषीभूषण मार्गाजवळील अत्यंत क्लीन परिसर पहिला की, स्व.रामभाऊ अण्णा संदानशिव यांचीच आठवण येते. कारण त्यांची संकल्पना आणि नगरपरिषदेचे योगदान यामुळेच हा एकेकाळी डर्टी असलेला परिसर अत्यंत क्लीन झाला आहे. आता या कृषीभूषण मार्गासाठी 60 लाखांचा निधी मंजूर केल्याने या मार्गाने थेट विप्रोपर्यंत पोहोचता येईल, अशी भावना आ.अनिल पाटील यांनी व्यक्त केली. ते प्रभाग क्रमांक 4 मध्ये विकासकामांच्या भूमिपूजनासह लोकार्पणप्रसंगी बोलत होते.
जिमच्या साहित्याचे लोकार्पण
अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चारमध्ये गांधलीपुरा भागात सामाजिक व दुर्बल घटकांसाठी पाच टक्के राखीव निधी अंतर्गत कृषीभूषण मार्गावर व्यायाम शाळेचे भुमिपुजन तसेच जिनगर गल्ली येथे कुरेशी व्यायाम शाळेच्या जिम साहित्य लोकार्पण आ.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगरसेवक नरेंद्र संदानशिव, नगरसेवक हाजी शेख मिस्तरी, नगरसेविका निशात बानो कुरेशी, फयाज पठाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी आ. अनिल पाटील यांच्यासह मान्यवरांचे आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मुस्लिम समाजासाठीही योगदान देणार
शहर विकासाचे ध्येय डोळ्यासमोर असल्याने आतापर्यंत तब्बल 15 कोटींचा निधी शहरासाठी उपलब्ध केला आहे. त्यातून भरीव अशी विकासकामे मार्गी लागली आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी उद्यानासाठी आधी 50 लाखांची मंजुरी मिळविली असताना आता पुन्हा 50 लाख मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. यामुळे ते उद्यान एक नवीन पिकनिक स्पॉट ठरणार आहे. निधीचा हा प्रवाह थांबणार नसल्याचे सांगत व्यायामशाळेसह पारधी समाजाच्या व्यायामशाळेसाठीही जिम साहित्य देण्याची ग्वाही आ.अनिल पाटील यांनी दिली. कुरेशी व्यायामशाळेच्या जिम साहित्य लोकार्पणस्थळी आमदारांचे स्वागतासह सत्कार केला. याठिकाणी मुस्लिम समाजासाठीही योगदान देण्याची ग्वाही आ.पाटील यांनी दिली.
यांची होती उपस्थिती
यावेळी भरत सोनवणे, धनराज पारधी, पन्नालाल मावळे, अप्पा देवा पारधी, रफिक शेख महमंद, अबिद मिस्तरी, नाविंद शेख, गुलाम नबी, हैदर मिस्तरी, रघु घोगले, गोपीचंद चव्हाण, साहेबराव साळुंखे, शब्बीर मामू, गंभीर पारधी, वामन भगत, पिंटू पारधी, गप्पा पहेलवान, वना मास्तर, कालु पहेलवान, दिनेश बिर्हाडे, अर्जुन गजरे, अशोक महाजन, रवी गढरे, ज्ञानेश्वर संदानशिव, विनोद बिर्हाडे, संजय बिर्हाडे यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी परिसरातील युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार सोमचंद संदानशिव यांनी मानले.