24 वर्षीय विवाहितेचा प्रसुतीदरम्यान मृत्यू

Married Woman Dies During Childbirth At Wadri Dam Settlement यावल : तालुक्यातील वड्री धरण वस्तीवरील एका 24 वर्षीय विवाहितेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला. प्रसूती वेदना होत असल्याने तिला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिची प्राणजोत मालवली. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगावात प्रसुती दरम्यान मृत्यू
पिंटी अनिल बारेला (24) असे मयताचे नाव आहे. पिंटी ही विवाहिता गरोदर असल्याने प्रसूती वेदना होत असल्याने तिला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले व तिला अधिक त्रास होत असल्याने तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले मात्र जळगाव येथे तिच्यावर प्रसूती होत असतांना तिचा शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे.