मुक्ताईनगर। येथील शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनतर्फे नुकतेच मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियापुर्व तपासणी शिबीर फाऊंडेशनचे अध्यक्ष एस.एम. उज्जैनकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हृदयरोग तज्ञ डॉ. जी.एन. मराठे होते. शिबिराचे उद्घाटन दिपाली सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. केतन सरोदे, डॉ. ब्रिजेश पाल, प्रमोद जैन यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात 142 रुग्णांची तपासणी करण्यात आली व 24 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
यांच्यावर करण्यात आली शस्त्रक्रिया
यामध्ये ताईबाई राऊत, चंद्रप्रभा मांडवेकर, काशिनाथ पानघाटे, भागिरथी धांडे, उषा बडगुजर, विठ्ठल मराठे, केशर झाल्टे, फयाज शेख, अमरसिंग राठोड, शांताबाई गवळे, गोकर्णा बावन्ने, नर्मदा नेमाडे, सरस्वती वाहूळकर, सुपडाबाई काटे, गया कोळी, संगिता पाटील, सुभद्रा इंगळे, विमल गाळे, सुपडा बेलदार आदी रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
यांनी घेतले परिश्रम
या शिबीराच्या यशस्वितेसाठी प्र.रा. पिवटे, विजय शुरपाटणे, नितीन भोंगरे, शामकांत रुले, सुधाकर पाटील, दिलीप पाटील, प्रशांत पाटील, मधुकर उज्जैनकर, डॉ. एन.जी. मराठे, सुनंदा मराठे, सचिन उज्जैनकर, अरविंद उज्जैनकर, संगिता उज्जैनकर, जगन्नाथ भोई यांनी सहकार्य केले. त्यांनी शिबीरात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना बसण्याची व्यवस्था करुन क्रमवारीने तपासणी केली.