24 कापूस बियाण्यावर विक्री बंदी आदेश

0

जळगाव । खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. काही दिवसापूर्वी जालना जिल्ह्यात बोगस कापुस बियाणे विक्रीस दाखल झाल्याची तक्रार होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यातील 24 कापुस बियाण्यावर विक्री बंदी आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यात 29 हजार दोनशे बिटी बियाणे दाखल झाले असून त्यापैकी 19 हजार चारशे पाकिटांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती कृषी अधिकारी मधुकर चौधरी यांनी सांगितली. कृषी संचालक आयुक्त यांच्या सुचनेनुसार बोगस बिटी बियाण्यावर विक्री बंदी आणण्यात आली आहे. मात्र जालना जिल्ह्यातील घटनेवरुन जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना बियाणे उपलब्ध करुन दिले जात नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत शेतकरी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बियाण्यांवर बंदी
राशी 659, पायर सरफास, सुला अ‍ॅग्रो बायोटेक अकोला कंपनीची एससीएच22, अंकुर सीड्स नागपूर, बीजी 3034, कृषीधन 532, 641,सोलर अ‍ॅग्रीटेक राजकोट कंपनीची सुरज व श्रीकांत या दोन वाण, बायर बायो सीड् आरसीएच 317, झायलम सीड्स हैद्राबाद एनएसपी 999, रामा अ‍ॅग्री जेनेटीक एचआरसीएस 55, नुझीवीडु सीड्स अकोला एमसीएच 7326, किर्तीमान अ‍ॅग्रो जेनेटीक केसीएचएच 932, वर्षा, स्वा, बीटी 904, कावेरी सीड्स केसीएचएच 8152, 707, नाथ बायो जेनेटीकची सुरभी, विभा सीड्स पावर सुफल अ‍ॅण्ड बायोटेक एसएसबी 3, श्रीराम बायो जनेटीक या बीयाण्यावर विक्री बंदी आदेश देण्यात आले आहे.