24 क्विंटल गव्हाची गोदामातून चोरी : धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्ह

धरणगाव : सुमारे 50 हजार रुपये किंमतीचा 24 क्विंटल गहू चोरट्यांनी तालुक्यातील पिंपळे शिवारातून गोदामातून लांबवल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांचा कसून शोध
विनोद प्रकाश पाटील (37, रा.पिंपरी खुर्द, ता.धरणगाव) हे व्यापारी असून त्यांचे धरणगाव तालुक्यातील चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळ शगुन कॉटेक्स जिनिंग कंपनीचे गोदाम आहे. या ठिकाणी त्यांनी 24 क्विंटल गहू इतर सामान ठेवला असताना 26 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संधी साधत 50 हजार रुपये किंमतीचे 40 कट्टे गहू लांबवला.हा प्रकार बुधवारी 27 एप्रिल रोजी पहाटे चार वाजता उघडकीस आला. या प्रकरणी विनोद पाटील यांनी धरणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पवार करीत आहे.