मुंबई: आजचा दिवस विधानसभेच्या निवडणुकीमुळे गाजला. विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान सातारा लोकसभा पोटनिवडणूक देखील विधानसभेसोबतच झाली. यात राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले उदयनराजे यांचा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी दणदणीत पराभव केला आहे. परंतु आज एक योगायोग असा की आज २४ ऑक्टोंबर आहे, उदयनराजे यांचा वाढदिवस देखील २४ तारखेलाच असतो. परंतू उदयनराजे यांचा वाढदिवस २४ फेब्रुवारीला असतो. वाढदिवसाच्या तारखेलाच उदयनराजे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
संपूर्ण राज्यात हा निकाल भाजपसाठी धक्कादायक मानला जातो आहे. या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.