पुणे : महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात येत आहे. या संदर्भातील तक्रारींचे पत्र सीबीआयला प्राप्त झाले आहे. त्या तक्रार पत्राची दाखल घेत सीबीआयने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना पत्र पाठवून संबधित प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. मात्र हे पत्र लपवून ठेवून प्रशासनाकडून भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केला पत्रकार परिषदेमध्ये केला.
संजय कानडे नावाच्या नागरिकाने सीबीआयकडे या योजनेची चौकशी करावी अशी मागणी केली.त्यावर सीबीआयने आयुक्तांना पत्र लिहून याबाबत चौकशी करण्यास सांगितले.मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने पुन्हा कानडे यांनी सीबीआयला स्मरणपत्र दिले. त्यामुळे सीबीआयने पुन्हा एकदा आयुक्तांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत.मात्र याबाबत सभासदांना अथवा पुणेकरांना कोणतीही कल्पना देण्यात आली नाही.
या बाबत शिंदे म्हणाले की 24 तास पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याचे आता सिद्ध झाले आहे. आता थेट सीबीआयने आयुक्तना पत्र पाठवून चौकशी करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारचे पत्र पाठून यापूर्वी महापालिकेला कधी सीबीआयने चौकशी करण्यास सांगितले नव्हते. यामुळे पालिकेची बदनामी होत असून या पत्रा बाबत आयुक्तांनी कोणालाही कल्पना दिली नाही, त्यामुळे सत्ताधार्यांची प्रशासनावर वचक राहिला नाही हे सिद्ध झाले आहे.
मुख्यसभेसमोर अहवाल ठेवा
1700 कोटीच्या प्रकल्पात 300 ते 400 कोटींचा भ्रष्टाचार झाला असून निविदा प्रक्रियेय रिंग करण्यात अली आहे. यात तथ्य वाटल्याने सीबीआयने पत्र पाठवले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच आयुक्तनी हे पत्र मुख्यसभेसमोर ठेवावे आणि त्याची चौकशी करून सविस्तर अहवाल मुख्यसभेपुढे ठेवावे अशी मागणी शिंदे यांनी केली