मुंबई । भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवागने पाकिस्तानकडून होणार्या हल्ल्यावर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. सेहवागने पाकिस्तानला छोटा डोस पाजून काम होत नसेल तर मोठा डोस पाजा असे आवाहन केले आहे. सेहवागने ट्विटर लिहिले आहे की, ’दोन भारतीय सैनिकांची अमानुष हत्या झाल्याने मी दुखी आहे. जवानांचं बलिदान वाया गेलं नाही पाहिजे. जर पाकिस्तानसाठी छोटा डोस काम करत नसेल, तर मोठा डोस दिला पाहिजे’. जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेच्या आत 250 मीटरपर्यंत घुसलेल्या पाकिस्तानी विशेष दलाच्या जवानांनी सोमवारी केलेल्या तोफगोळ्यांच्या मा-यात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत.