अमळनेर । येथील भगवा चौक परिसर पटवारी कॉलनी अमळनेर आयोजित अखंड हरिनाम किर्तन सप्ताह रविवार 30 एप्रिल 2017 पासून सुरू झाला असून 7 मे पर्यंत अखंड सुरू राहणार आहे. अमळनेर येथील भगवा चौक परिसरात सर्व देव देवतांच्या वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा तसेच प.पु गुरुवर्य श्रीपाद बाबा व कुडवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या कृपा आशीर्वादाने व परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने कीर्तनकार महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कीर्तन सप्ताह काकडा आरती सकाळी 6 वाजता हरिपाठ सायंकाळी 6ते 7 वाजेपर्येंत व कीर्तन रात्री 8ते 10 वाजेपर्यंत राहणार आहे.
7 मे रोजी होणार काल्याचे कीर्तन
संर्कित असून 30 रोजी हभप लक्ष्मण महाराज (तांदलवाडीकर), 1 मे रोजी हभप संजयदास महाराज (पाचोरा), 2 मे हभप जनार्दन महाराज (आरावेकर), 3 मे रोजी हभप नाना महाराज (नरडाणेकर), 4 मे रोजी हभप रवींद्र महाराज (वरसाडेकर), 5 मे रोजी हभप प्रकाश आण्णा महाराज (खेडगावकर), 6 मे रोजी हभप शिवव्याख्याते गजानन महाराज, देले पाटील (जालना), 7 मे रोजी हभप गोविंद महाराज (वरसाडेकर) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तरी परिसरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोज भगवा चौक परिसरातील नारीकांकडून होत आहे.