पुणे : विना हेल्मेट दुचाकी चालवित महापालिकेच्या पार्किंगमध्ये जाणार्या 244 कर्मचार्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी अवघ्या तीन तासांत शिवाजीनगर वाहतूक विभागाकडून विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करत दंडवसुली करण्यात आली.
प्रामुख्याने शासकीय आणि निमशासकीय कर्मचार्यांमध्ये हेल्मेट वापराबद्दल जनजागृतीकरण्यात आली आहे. असे असतानाही शासकीय कार्यालयातील कर्मचार्यांकडून हेल्मेट वापरण्यास प्राधान्य दिले जात नसल्याचे दिसून आले होते. त्या पार्श्वभूमीवर पालिकाभवनासमोर विना हेल्मेट दुचाकीस्वारांना कारवाईचा दणका देण्यात आला. विना हेल्मेट कामावर येणार्या दुचाकीस्वारांच्या गाड्यांना महापालिकेतील पार्किंगमध्ये जागा देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मागील आठ दिवसांपासून विना हेल्मेट दुचाकी चालवित कामावर येणार्या कर्मचार्यांवर महापालिकेकडून पार्किंग न देण्याबद्दलची कारवाईच केली जात नव्हती.