जळगाव । देशात वाढत्या दहशतवादातून घडणार्या घटनाचा निषेध म्हणून शहरात 21 मे रोजी दहशतवादा विरोधात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. देशासाठी लढणारे सैनिक पोलीस दलातील कर्मचारी,पोलीस अधिकारी यांचे मनोबल वाढण्यासाठी राजकारण विरहीत असे मूक मोर्चा आयोजन करण्यात आले आहे. देशाचा हिताचा उपक्रम सर्वात आधी जळगाव जिल्ह्यात होत असल्याने विविध संघटना आणि संस्थाचा मोठ्या प्रमाणावर वाढता प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये जळगाव जनता कर्मचारी हितवर्धक संघ,श्री क्षत्रिय अहिर शिंपी हितवर्धक संस्था, जळगाव जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटना जळगाव, जिल्हा बार असोएशनयासह जिल्ह्यातील संघटना आणि संस्थानी पाठिबा दर्शविला आहे. शहरातील गणेश तसेच दुर्गा मंडळे देखील मोठ्या प्रमाणावर सामील होणार आहे.
22 रोजी बदली: जळगाव। जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील बदली प्रक्रियेला मे-जुन महिन्यात सुरुवात होत असते. या वर्षी शासन निर्णयानुसार अवघड व सोपेक्षेत्र निहाय बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागातर्फे अवघड व सोपे क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले आहे. शिक्षण विभागातील बदली प्रक्रियेस सोमवारी 22 पासून सुरुवात होत असून पहिल्य दिवशी शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांची बदली होणार आहे. बदली पात्र असलेल्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. याबाबत काही हरकती असल्यास शिक्षण विभागाकडे नोंदविण्याचे सांगण्यात आले होते.
आंतरजातीय विवाह करणार्यांना आर्थिक मदत
जळगाव। देशासह राज्यात जाती धर्मावरुन सामाजिक तेड निर्माण होते. यातुन जाती जातींत मतभेद निर्माण होवून देशाच्या विकासाला ते बाधक ठरु शकते. जाती धर्म नष्ट व्हावे यासाठी शासनातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहे. त्यांच्याच एक भाग म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी समाजकल्याण विभागातर्फे आर्थिक मदत देण्यात येत असते. या वर्षी जिल्ह्यातील 126 लाभार्थ्यांना प्रत्येकी पन्नास हजाराची मदत समाजकल्याण विभागातर्फे देण्यात येत आहे. जवळपास 26 लाख रुपये वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्याभरातुन 126 अर्ज प्राप्त झाले होते सर्वचे सर्व अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. मागील वर्षी 153 आंतरजातीय विवाह करणार्यांना लाभ देण्यात आले होते.