भुसावळ- विठ्ठल-रूखमाई पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावाच्या कर्ज भरणा केल्याचा खोट्या व बनावट पावत्या तयार करून तसेच मिळकतीवरील जप्ती उठवण्याबाबतचा आदेश तयार करून तो खरा असल्याचे भासवून कागदपत्रांच्या आधारे सातबारा उतार्यावरील बोजे कमी करून त्या जमिनी स्वतःच्या नावाने खरेदी करून तब्बल 25 लाख 32 हजार 558 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या वसुली अधिकार्यांसह आठ जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी अनिल घनश्यामदास दर्डा (नवजीवन हौसिंग सोसायटी, सिंधी कॉलनी, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साबीर नूर मो.पटेल, तजमुल नूर अहमद पटेल, नूर मो.मुसा पटेल, एजाज अहमद नूर मो.पटेल, नजमुनिसा नूर मो.पटेल, पतसंस्थेचे मॅनेजर प्रमोद किसन चौधरी, पतसंस्थेचे विशेष वसुली अधिकारी बी.के.अटकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.