जळगाव । शासनाच्या धोरणानुसार आर्थिक दुष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्याना शिक्षण देण्यासाठी 25 टक्के अनुदान प्रक्र्रिया सुरु करण्यात आली आहे. शासन नियमानुसार 25 टक्के अनुदाना अंतर्गत शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी प्रवेशासाठी प्राप्त शाळांनी प्रवेश प्रक्रिया एप्रिल महिन्यापर्यत पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. 10 जानेवारीच्या शासननिर्णया नुसार हे निर्देश देण्यात आलेले आहे. प्रवेश प्रक्रियेसंबधी प्रशिक्षण देण्यासाठी जळगाव शहरातील ला.ना.शाळेत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर, आणि महानगर पालिकेच्या कर्मचार्यांना यासंबंधी निर्देश देवून प्रशिक्षण देण्यात आले. अशी माहिती उपशिक्षणाधिकारी डॉ.डी.एम.देवांग यांनी दिली.
मदत केंद्र उभारण्यात येणार
25 टक्के अनुदानाअंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया ही ऑनलाईन पध्दतीने करावयाची असल्याने ऑनलाईन अर्ज करीत असतांना पालकांना व शिक्षकांना कोणतीही अडचण उद्भवल्यास योग्य ती माहिती देण्यासाठी मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. जिल्हा स्तरीय मदत केंद्रात पाच अधिकार्यांचा समावेश असणार असून यात उपशिक्षणाधिकारी डॉ.डी.एम.देवांग, विजय पवार, गुरुनंदन सुर्यवंशी, विवेक महाजनी, अमोल पाटील यांचा समावेश असणार आहे. जिल्हा मदत केंद्रा प्रमाणेच तालुकास्तरावर देखील मदत केंद्र उभारले जाणार आहे.
उत्पन्न मर्यादा एक लाख
आर्थिक दृष्टा दुर्बल घटकातील गरिब विद्यार्थ्याना 25 टक्के अनुदाना अंतर्गत प्रवेश देण्याचे धोरण शासनाने ठरविले आहे. प्रवेशासाठी पात्रतेचे काही निकष ठरविण्यात आलेले आहे. ते म्हणजे पालकांचा आर्थिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. एक लाखाच्या आत उत्पन्न असणार्या कुंटुंबातील विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
प्रवेश प्रक्रिया कार्यक्रम
25 टक्के अनुदाना अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसंबंधी शासनातर्फे कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. 16 जानेवारी पासून प्रवेशासाठी प्राप्त शाळांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावयाची आहे. तसेच 25 टक्के अनुदाना अंतर्गत पात्र विद्यार्थ्याची 5 फेंब्रवारी पासून अर्ज करता येणार आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत पाच वेळेस लॉट्री पध्दत काढण्यात येणार असून प्रवेश प्रक्रिया 29 एप्रिल पर्यत पुर्ण करावयाची आहे.