जळगाव । आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाल्यांना शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शैक्षणिक सवलत दिली जाते. 25 टक्के शाळाप्रवेश उपक्रमांतर्गत त्यांना आर्थिक सवलत दिली जाते. जिल्ह्यातील दुर्बल घटकातील पाल्यांसाठी शिक्षण विभागाने अर्ज मागविले होते. 25 टक्के अंतर्गत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु असून प्रवेशाचा दुसरा टप्पा देखील पुर्ण होत आला आहे. 25 टक्के अनुदानासाठी जिल्ह्याला 39 लाख 99 हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. कोषागार (ट्रेझरी) विभागात हा निधी जमा झाला आहे. 2015-16 साठी प्रवेशास पात्र शाळांना हा अनुदान देण्यात येणार आहे. विद्यार्थी संख्येनुसार हा निधी वितरीत करण्यात येणार आहे. 25 टक्के अंतर्गत एकुण 3 हजार 68 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.