जळगाव । जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाल्यांना शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत असलेल्या 25 टक्के मोफत शिक्षण देण्यात येते. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. 2 मार्च रोजी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. 25 टक्के पात्रतेसाठी लॉटरी पध्दतीने सोडत काढण्यासाठी ख्वाजामिया चौकश येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बैठक घेण्यात आली.
प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या उपस्थिती सोडत प्रक्रिया पार पडली. यानंतर अंतिम निवड पुणे येथुन होणार आहे. संपुर्णरीत्या परीपुर्ण असलेले 3 हजार 7 अर्ज लॉटरी प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे. लॉटरी प्रक्रियेसाठी सोडत प्रसंगी उपशिक्षणाधिकारी देवांग यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते.