25 टक्के मोफत शाळा प्रवेशाच्या सोडतीचा दुसरा टप्पा सुरु

0

जळगाव । आर्थिकदुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या मोफत 25 टक्के शाळा प्रवेशाच्या पहिल्या सोडतीत एक हजार 594 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. प्रवेशासाठी मार्च महिन्यात पहिली सोडत काढण्यात आली. यात जिल्ह्यातील 262 शाळांमध्ये 25 टक्के अंतर्गत प्रवेश देण्यात येणार आहे. पहिल्या यादीत नर्सरीच्या 83 पैकी 71 तर इतर 3 हजार 585 पैकी 2 हजार 465 प्रवेशासाठी पात्र ठरले त्यापैकी नर्सरीतील 46 तर पहिलीच्या वर्गातील 1 हजार 548 प्रवेश पुर्ण झाले आहे. उर्वरीत दुसर्‍या टप्प्याची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून पात्र पाल्यांची नावे एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. निवड झाल्याचा एसएमएस मिळालेल्या पालकांना 27 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान संबंधित शाळेत जाऊन प्रवेश घेता येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.