नवी दिल्ली । भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी माहिती दिली आहे की, इराणने 25 भारतीय मच्छिमारांना त्यांच्या बोटीसह ताब्यात घेतले होते. सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे की, त्या मच्छिमारांची आता सुटका करण्यात आली आहे.
स्वराज यांनी ट्विट केले आहे की, ’मला हे सांगतांना आनंद होत आहे की, ज्या 25 तमिळनाडूच्या मच्छिमारांना 25 मार्च 2017 ला इराणने त्यांना बहरीनला सोपवण्यात आले आहे.’ त्यांनी तेहराण येथील भारतीय दुतावासाला शुभेच्छा दिल्या आहेत. मच्छिमारांची सुटका यशस्वी केल्याने त्यांनी भारतीय दुतावासाचं कौतूक केले आहे.