25 लाखांसाठी विवाहितेचा छळ : पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Nashirabad married woman harassed for not bringing Rs 25 lakh : Punekar case filed against husband and in-laws नशिराबाद : गावातील माहेर व पुणे येथील सासर असलेल्या विवाहितेने माहेरून 25 लाख रुपये न आणल्याने पतीसह सासरच्यांनी छळ केला. छळ असह्य झाल्याने विवाहितेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर मंगळवारी पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सासरच्या मंडळींनी केला छळ
नशिराबाद येथील माहेर असलेल्या माधवी अतुल बढे (33) यांचा विवाह पुणे येथील अतुल लीलाधर बढे यांच्याशी रीतिरिवाजनुसार झाला. लग्नाची सुरुवातीचे दिवस चांगला गेल्यानंतर विवाहितेला माहेरहून 25 लाखाची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिचा छळ केला. तसेच तिला शिवीगाळ करून मारहाण केली. दरम्यान तसेच तिचे सासू, सासरे, ननंद यांनी देखील गांजपाठ केला. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या.

या संशयीतांविरोधात गुन्हा
मंगळवारी विवाहितेने नशिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने पती अतुल लिलाधर बडे, सासरे लिलाधर डालु बढे, नंदोई दिनकर महारु राणे, नणंद सुनीता दिनकर राणे, भाची सायली दिनकर (सर्व रा. रूपानगर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.