माजी विद्यार्थ्यांची लागली हजेरी
चाकणः शिवाजी विद्या मंदीर मधील शैक्षणिक वर्ष 1992-1993 मधील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन रविवारी प्रशालेत करण्यात आले होते. तब्बल 25 वर्षांनी एकत्र येण्याचा योग आल्याने जुन्या सवंगड्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य आबासाहेब जंगले होते. या सोहळ्याचे आयोजन प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी केले होते. या कार्यक्रमास तत्कालीन शिक्षक व जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वाडेकर, सचिव सुभाष गारगोटे, सहसचिव किशोर गोरे, प्राचार्य अरुण देशमुख, उपप्राचार्य दिलीप गोरे , माजी प्राचार्य मार्तंड खोडदे, राजू दीक्षित, रामदास उनधरे, वसंत सूर्यवंशी, सुभाष दाभाडे, अ.बा.बनसोडे, व्ही.एन.गोरे, पद्माकर महाजन, राजेंद्र खरमाटे आदी उपस्थित होते.
उपयुक्त वस्तूंची शाळेस भेट
यावेळी माजी प्राचार्य आणि शिक्षकांनी यांनी विद्यार्थी कसे घडविले, कसे घडवावे, शाळा कशी उभी केली याबद्दल सांगितले. यावेळी अॅड. किरण झिंजुरके, अॅड. प्रीतम शिंदे, पत्रकार अविनाश दुधवडे, संतोष परदेशी, अमोल घोगरे, जमीर काझी, अभय नगरे, राम नाणेकर, हृषीकेश परदेशी, श्रीकांत गवळी, विकास नाणेकर, ब्रिजेश जाधव, सुनील दौंडकर, संतोष केळकर, सचिन गोरे, अतुल कांडगे आदी अनेक माजी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये आपण कसे घडलो याबाबत अनुभव व्यक्त केला. या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेस उपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम गोरे, सूत्रसंचालन सुर्यकांत मुंगसे यांनी केले तर किरण झिंजुरके यांनी उपस्थितांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.