जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : आरोपीचा बाजारपेठ पोलिसांकडे ताबा
भुसावळ- दारू देण्याच्या वादातून तालुक्यातील साकेगाव येथील आकाश शिवा उपासे या ईसमाचा खून करण्यात आला होता तर या प्रकरणी संशयीत आरोपी जितेंद्र श्रावण जावळे (51, रा.वाल्मीक नगर, भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी तब्बल 25 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. आरोपी वर्धा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मंगळवारी मुसक्या आवळल्या
नातेवाईकांनी केला आरोपी मृत झाल्याचा बनाव
आरोपी जितेंद्र जावळे यास खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याची नाशिकच्या कारागृहात रवानगी होती मात्र त्यास पॅरोल रजा मंजूर झाल्यानंतर तो भुसावळात परतला होता मात्र त्याने भुसावळातून पळ काढल्यानंतर बाजारपेठ पोलिसात गुरनं.182/2013, भादंवि 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यानच्या काळात आरोपीचा अनेकदा शोध घेण्यात मात्र कुटुंबियांनी आरोपी मयत झाल्याची बतावणी केली. आरोपी वर्धा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीला बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक सुनील कुराडे, नरूद्दीन शेख, अनिल इंगळे, अनिल देशमुख, संतोष मायकल, गफूर तडवी आदींच्या पथकाने वर्धा येथून आरोपी जितेंद्र श्रावण जावळे (51, रा.वाल्मीक नगर, भुसावळ) च्या मुसक्या आवळल्या.