26 जुन रोजी समता रॅलीचे आयोजन

0

नंदुरबार । राज्य शासनाने 26 जुन हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येते त्या अनुषंगाने समाज कल्याण कार्यालयामार्फत समता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राकेश महाजन यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.समता रॅली 26 जून 2017 रोजी सकाळी ठिक 9.00 वाजता जुने पोलिस कवायत मैदान येथून निघणार असून नगरपालिका चौक-शिरीषकुमार चौक-हाटदरवाजा व जुने पोलीस कवायत मैदान येथे समारोप होणार आहे.रॅलीचे उदघाटन मान्यवरांचे हस्ते होणार आहे.