जळगाव । मनपाची महासभा आज 26 रोजी सकाळी 11 वाजता महापौर ललित कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी महिला बालकल्याण समितीचे पुनर्गठण करण्यासाठी 9 सदस्य आणि स्थायी समितीसाठी पक्षीय बलाबलनुसार आठ सदस्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहे.
मनपा स्थायी समितीतील 16 सदस्यांपैकी आठ सदस्य निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पक्षीय बलाबलनुसार नवीन आठ सदस्यांची नावे आणि महिला बालकल्याण समितीची पुनर्गठण करण्यात येणार असल्याने नवीन 9 सदस्यांची नावे महासभेत जाहीर करण्यात येणार आहे. तसेच आरसीएचअंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांनी वेतन वाढसाठी गेलेल्या विनंतीनुसार प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावर निर्णय घेणे. पाणीपुरवठा विभाग आणि आरोग्य विभागाकरीता वाहन खरेदीसाठी 13 कोटी 44 लाख 698 रुपयाच्या खर्चास मान्यता देणे, यासह 15 विषयांवर महासभेत चर्चा होणार आहे.