26 रोजी ‘शिवराय ते भिमराय’ अभिवादनाचा कार्यक्रम

0

लोहारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडी अँड रिसर्च सेंटर चाळीसगावच्यावतीने ‘शिवराय ते भिमराय’ अभिवादनाचा कार्यक्रम 26 जानेवारी रोजी आनंदवाडीत आयोजित करीत आहो. डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानामुळे देशात लोकशाहीची पाळेमुळे रुजू शकली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानले आहे. त्यामुळे ह्या दिवसाचे औचित्य साधून ‘शिवराय ते भिमराय’ अभिवादनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भिमा कोरेगावच्या दंगलीमागे षडयंत्र होते . मराठा – अनु.जाती जमाती मध्ये तेढ निर्माण करण्याचा डाव त्यांचा होता. मात्र ही खेळी दोन्ही समाजाच्या बांधवांना लक्षात आली आहे. त्यामुळे 26 जानेवारी ला शिवराय ते भिमराय अभियान हा कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वस्तरावर राबवुन लोकांनी एकत्र येऊन हा अभियानाचा कार्यक्रम घ्यावा अये आवाहन प्रा.गौतम निकम यांनी केले आहे.