26 ला शोभायात्रेने शेतकरी कर्जमुक्ती, हमीभाव शेतकरी परिषदेला सुरूवात

0

जळगाव । 26 ला राज्यव्यापी भव्य शेतकरी संपूर्ण कर्जमुक्ती व हमीभाव शेतकरी परिषदेला प्रारंभ होत असून सकाळी 10 वाजता शोभायात्रा ढोल,परंपरागत वाजंत्री यांसोबत सुरु होईल व दुपारी 12 वाजता परिषदेला सुरवात होणार आहे. साधारणतः 20ते 25 हजार लोकसमूह सभेला उपस्थित राहतील. त्यामुळे नूतन मराठा महाविद्यालयाच्या पटांगणात 20 हजार लोक बसतील एवढी मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. महात्मा फुले यांच्या खटाव गावापासून 15 सप्टेंबर पासून किसान जागर यात्रा निघाली आहे .तसेच किसान सभेने 7 ते 15 सप्टेंबर 17 यात्रा काढल्या आता त्याचा समारोप जळगाव जिल्ह्यात होत आहे.

यात्रेचे जळगावात होणार समारोप
या परिषदेत रघुनाथदादा पाटील,खासदार राजू शेट्टी,आमदार बच्चू कडू,डॉ.अजित नवले,डॉ.बाबा आढाव ,मुकुंद सपकाळे,आमदार जयंत पाटील,कॉ.अशोक ढवळे,प्रतिभा शिंदे,व सचिन धांडे आदी उपस्थित राहणार आहेत. यात शेतकर्‍यांच्या हिताच्या मागण्या आहेत. राज्यातील सर्व शेतकर्‍यांचे आज पर्यंतचे सर्व प्रकारचे नियमित व थकीत सर्व कर्ज माफ करा व 7/12 कोरा करा .कर्जमाफीत पिक कर्ज ,शेती औजारे ,सिंचन सुविधा यासारखी सर्व शेती पूरक कर्ज ,मध्यम मुदतीची कर्ज,सावकारी कर्ज ,माईक्रो फायनान्स ,पतसंस्था,अर्बन बँक ,बचत गट,विविध महामंडळाची कर्ज,शेतकरी पाल्यांच्या शिक्षणासाठी काढलेली शेक्षणिक कर्ज,या सर्वांसह शेतकर्‍यांच्या आजवरच्या सर्व कर्जांचा समावेश करावा.

यांची असणार प्रमुख उपस्थिती
शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी शेतीमालाला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के इतका नफा देत हमी भाव देण्यात यावा.शेत मालावरील निर्यात बंदी उठवा व शेतकर्‍याना वयाच्या 60 वर्ष्यानंतर किमान 3000 रुपये पेन्शन सुरु करा.शेतकर्‍यांचे संपूर्ण वीजबिल माफ करा.उत्पादन खर्चात वीजबिलाचा समावेश नसल्यामुळे वीजबिल मोफत द्या. या न्याय मागण्यांसाठी हि परिषद आयोजित केली गेली आहे. सकाळी 10 वाजता शोभायात्रा जी.एस.ग्राउंड मार्गे सुरवात होऊन नेहरू चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्थानक,टावर चौक,चित्रा चौक ते नूतन मराठा महाविद्यालय प्रांगण याठिकाणी शोभायात्रा सामारोप होईल त्यानंतर राज्यव्यापी शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव शेतकरी परिषदेला सुरवात होईल. या परीषदेकरिता जळगाव ,धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाना उपस्थित राहण्याचे आवाहन परीषदेच्या निमंत्रक व सुकाणू समितीच्या सदस्या प्रतिभा शिंदे ,सचिन धांडे,मुकुंद सपकाळे ,खलील देशमुख ,प्रदीप देसले ,विवेक रणदिवे ,संजय घुगे ,दिलीप सपकाळे ,शरद चौधरी ,संदीप घोरपडे ,कॉ.विजय पवार ,किरण भोळे,हेमंत पाटील,सुजित पाटील ,सचिन सोमवंशी यांनी केले आहे.