26 वर्षीय सोमनाथला हवेय किडनीचे दान

0

धुळे। सहा महिन्यांपासून दोन्ही किडन्या निकामी झाल्याने मुकटी येथील सोमनाथ आनंदा मिस्तरी या 26 वर्षीय तरुणासमोर अत्यंत बिकट परिस्थीती येऊन ठेपली असल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांच्या वडीलांनी आर्थिक मदत मिळणेकामी आवाहन केले आहे. यापुर्वी धुळे येथे त्यानंतर सुरत व आता अहमदाबादमध्ये सोमनाथ वर उपचार सुरु असून घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची व बिकट असल्याने सामाजिक प्रतिनिधींनी अथवा मदत करणार्‍या दानशुर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन ईश्‍वर बडगुजर, सरलाबाई मिस्तरी, अनिल मोरे आणि त्याचे वडील आनंदा शंकर मिस्तरी यांनी केले आहे.

प्राण वाचविण्यासाठी आई-वडिलांची धडपड
आईने उपचारासाठी अंगावरील सर्व दागिने विकून तसेच घरातील चिजवस्तू विकून जेमतेम डायलेसीस होईल इतके पैसे जमा करुन मुलाचे प्राण वाचावे म्हणून प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर स्वतःची एक किडनी मॅच झाल्याने तीही देण्याची तयारी दर्शविली आहे. सोमनाथ हा विवाहित असून सध्या त्यांची पत्नी गरोदर आहे. सध्या त्याला अडीच ते 3 लाख रुपयांची गरज असून मदत करु इच्छिणार्‍या दानशुर व्यक्तींनी आनंदा शंकर मिस्तरी यांच्या 09766291869 या क्रमांका वर संपर्क साधवा अथवा अप्रत्यक्ष मदत करु इच्छिणार्‍यांनी सेंट्रल बँक मुकटी च्या 22568 77452 या अकांऊंटमध्ये मदत जमा करावी असे आवाहनही काल झालेल्या पत्रपरिषदेत केले.