दोंडाईचा । शिंदखेडा व दोंडाईचा शहरात स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत हगणदारीमुक्त झालेल्या शहराची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय समितीने शिंदखेडा व दोंडाईचा शहरातील प्रत्येक वार्ड वाईज सार्वजनिक शौचालय व वैयक्तिक शौचालय लाभार्थी यांची प्रत्यक्ष स्थळी भेट देउन शासकीय अधिकारी मृदुला आंडे, सहाय्यक संचालक नगर परिषद कोकण विभाग, स्नेहल विसपुते जिल्हा प्रशासन अधिकारी न. पा. शाखा पालघर, पल्लवी शिरसाठ, धुळे जि. प. अधिकारी व राकेश कलाल , तुषार पाटील, संजय कापडे या राज्यस्तरीय समितीने या चार दिवसात पहाणी केली.
सार्वजनिक शौचालय व वैयक्तिक शौचालयांची माहिती
स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत हगणदारीमुक्त झालेल्या शहराची तपासणी करण्यासाठी राज्यस्तरीय समितीने शिंदखेडा व दोंडाईचा शहरातील प्रत्येक वार्ड वाईज सार्वजनिक शौचालय व वैयक्तिक शौचालय लाभार्थी यांची माहिती घेऊन प्रत्येक्ष पाहणी केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काही लाभार्थीत्यांना आवश्यक सुचना केल्यात. या समितीने संपूर्ण शहरातील उघड्यावर शौचास जाण्याची जागेची पहाणी केली. या समितीच्या अहवालानुसार गाव हगणदारीमुक्त आहे कि नाही ते ठरवण्यात येणार आहे. यावेळी नगरपरिषदचे मुख्याधिकारी अजित निकत, न.प. अभियंता शिवनंदन राजपूत, राजेश ईशी, डॉक्टर जोहरा शहा, पलिका आरोग्य निरीक्षक शरद महाजन, मोतीराम बनसोळ , पंकज महाजन, न. प. कर्मचारी सचिन पाटील, राकेश वाडीले, राजु बडगुजर, शेख गणि रज्जाक, अजय माहोर ,रघुनाथ बैसाणे, राजेंद्र चौधरी, कांतीलाल मोहिते, भीमराव पवार, महेंद्र टाक, संतोष माणिक, निलेश लोळ आकाश कांबळे,सागर ओतारी सलिम शेख व दीपकसिंग ठाकुर, अध्यक्ष-सेवा फाउंडेशन सार्वजनिक शौचालय व्यवस्थापन यांनी दत केली.