प्रतिभा वाणी हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

0

एरंडोल । येथील रा.ति.काबरे विद्यालयातील इयत्ता 10 वीची विद्यार्थिनी प्रतीक्षा अरविंद वाणी ही जयेश फाउंडेशन कळवण या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जळगाव जिल्हया चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. या संस्थेमार्फत तिला 11 वी व 12 वीचे शिक्षण मोफत व सीईटी जेई नीट याचेही शिक्षण मोफत मिळणार आहे. ती एरंडोल बस आगारातील लिपिक अरविंद रघुनाथ वाणी यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल तिचे मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने व शिक्षकांनी कौतुक केले आहे.